
महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका नगराध्यक्ष पदासह सर्व 26 नगरसेवक मतदान न होताच विजयी!
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यात ऐतिहासिक निकाल पहायला मिळाला आहे.
येथे नगराध्यक्ष पदासह सर्व 26 नगरसेवक विजयी झाले आहेत. मतदान न होताच हे सर्वजण विजयी झाले आहेत. यामुळे निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.
संपूर्ण राज्यात बिनविरोध निवडणुकीमुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिका चच्रेत आली आहे. निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदा सह सर्व 26 जागांवरती भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांच्यासमोर निवडणूक लढायला उमेदवार नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. या बिनविरोध निवडीमुळे महान पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा विक्रम घडला आहे. या निकालामुळे राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची राजकीय उंची वाढली आहे. त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली होती. मात्र त्यांनी निर्विवाद यश मिळवत भाजपाचा झेंडा पालिकेवरती रोवल्यामुळे राज्यात पहिलं मोठं यश हे रावलांच्या माध्यमातून भाजपाला मिळालेला आहे.
दोंडाईचा नगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दूरध्वनी द्वारे सर्व विजयी नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत




