
गुहागर तालुक्यातील विसापूर कारूळ बौद्धवाडी येथे तरुणाची मानेवर ब्लेडने वार करून आत्महत्या
गुहागर तालुक्यातील विसापूर कारूळ बौद्धवाडी येथे ३८ वर्षीय तरुणाने मानेच्या मागील बाजूस ब्लेडने वार करून घरामध्येच आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास केली. विसापूर कारूळ बौद्धवाडी येथील प्रशांत चंद्रकांत पवार (वय ३८) हा गवंडी काम करत होता. त्याला मध्येच आकडी येत होती. तसेच दारूचेही व्यसन होते, अशी माहिती घरच्यांनी दिली. बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास प्रशांत याने आपल्या राहत्या घरामध्ये धारदार ब्लेडने स्वतःच्या मानेच्या मागील बाजूस वार करून घेतले. प्रशांत हा रक्त बंबाळ होऊन खाली कोसळला होता. हा प्रकार घरच्यांनी पाहाताच उपचारासाठी धावपळ केली. मात्र, तोपर्यंत प्रशांत मयत झाला होता. प्रशांत याला आईवडील आणि दोन भाऊ आहेत. याप्रकारणी गुहागर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे करत आहेत.www.konkantoday.com




