
गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रेला प्रारंभ

गावखडी : भक्तगणांचे मनोरथ सिद्ध करणारी श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्रअक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रेला रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथून प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी मठाधिपती श्री गुरुदेव दास दिगंबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २१ नोव्हेंबरला प्रारंभ झाला. पदयात्रचे हे २० वे वर्ष आहे.
पदयात्रा मार्गक्रमण अशी असेल : २१ नोव्हेंबर रोजी गावखडी मठ येथून प्रारंभ. २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, हातखंबा. २३ नोव्हेंबर रोजी नाणीज, करंजारी. २४ नोव्हेंबर रोजी दाभोळे, साखरपा. २५ नोव्हेंबर रोजी आंबा, मलकापूर. २६ नोव्हेंबर रोजी बांबवडे, पैजारवाडी. २७ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर (पंचगंगा नदी घाट), मार्केट यार्ड, कोल्हापूर. २८ नोव्हेंबर रोजी हातकणंगले, निमशिरगाव. २९ नोव्हेंबर रोजी मिरज, भोसेगाव. ३० नोव्हेंबर रोजी कुची, शेळकेवाडी. १ डिसेंबर रोजी जुनोनी, उदनवाडी. २ डिसेंबर- सांगोला, आंधळगाव. ३ डिसेंबर रोजी गणेशवाडी, माचणुर. ४ डिसेंबर- सोहाळे, कामती खुर्द. ५ डिसेंबर रोजी तीऱ्हे, सोलापूर. ६ डिसेंबर रोजी कुंभारी, तोगराळी. ७ डिसेंबर रोजी कोन्हाळी, कोन्हाळी. ८ डिसेंबर रोजी अक्कलकोट. ९ डिसेंबर- गावखडी सांयकाळी. १० डिसेंबर श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे श्री स्वामी पादुकांना मंगलस्नान, पुजन, महाआरती, महाप्रसाद हा सोहळा संपन्न होईल.




