
’आध्यात्मिक आरोग्य’ या विषयावर आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांचे आज रत्नागिरीत व्याख्यान
रत्नागिरी शहरातील खालची आळी येथील मारुती कॉमन क्लब माघी गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रत्येक महिन्याच्या शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचेच औचित्य साधून २२ नोव्हेंबर रोजी ’आध्यात्मिक आरोग्य’ (प. पू. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात दडलेलं आरोग्य) या विषयावर आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांचे व्याख्यान शहरातील खालची आळी येथे श्री मुरलीधर मंदिरात सायं. ७ वा. आयोजित करण्यात आले आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्षात सुवर्ण वर्षाच्या लोगोचे महोत्सवी अनावरण, कीर्तनकार कैलास खरे, मुंबईतील गायक मनोज देसाई यांचा ’रंग सुरांचे’, सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांचा ’सायबर संस्कार’, मारुती कॉमन क्लबचा ’भजन’ संध्या’, राधेय पंडित यांचा ’गप्पा ऐतिहासिक रत्नागिरीच्या’ असे विविधरंगी कार्यक्रम पार पडले आहेत.
www.konkantoday.com




