
रत्नागिरीत टीईटी परीक्षेची रत्नागिरी जिल्ह्यात जय्यत तयारी !
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार्या बहुप्रतीक्षित शिक्षक पात्रता परीक्षेची रत्नागिरी जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी होणार्या या महत्वपूर्ण परीक्षेसाठी जिल्ह्यात १० केंद्रांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने चोख आणि पारदर्शक व्यवस्थेसह तयारी केली आहे. शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली ही परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यात या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. या परीक्षेसाठी १० केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यामध्ये पेपर १ साठी १ हजार ७६२ उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. पेपर २ साठी २ हजार ५८९ उमेदवारांची संख्या आहे. या परीक्षेवेळी ३५० कर्मचार्यांची नियोजनासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




