
बेपत्ता व्यक्तींबाबत पोलीसांचे आवाहन
रत्नागिरी, दि. 21 ) : जिल्ह्यातून विविध कालावधीत नापत्ता झालेल्या व्यक्तींचा पोलीस विभागाकडून शोध घेण्यात येत आहे. नागरिकांना कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आढळल्यास पोलीसांना कळवावे. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
संतोष देवाप्पा पेटर्गे, वय २० वर्षे, व्यवसाय-शिक्षण, ए.जी.पाटील इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर रा.हुलजंती, ता.मंगळवेढा, जि. सोलापूर हे १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते १०.४५ वाजताच्या सुमारास गणपतीपुळे, ता.जि. रत्नागिरी येथून ता.जि.रत्नागिरी नापत्ता झाले आहेत.
त्यांची उंची ५ फूट ६ इंच, वर्ण-गोरा, बांधा-मध्यम, केस-काळे, डोळे-काळे,मिशी-बारीक, चेहरा-उभट, नेसणी-काळ्या कलर्सचे अप्पर व जिन्सची निळ्या कलरची पॅन्ट, पायात भोजे व तपकीरी रंगाचे सॅन्डेल. अंगावर कोणत्याही मौल्यवान चिजवस्तू नाही.
श्रीपत लक्ष्मण भुवड, वय-६८ वर्षे, रा.पन्हळी, ता.मंडणगड, हे सुमारे २० ते २५ वर्षांपुर्वी त्यांचे राहते घरातुन मुंबई येथे नोकरीनिमित्त जात आहे असे सांगुन निघुन गेले तेव्हापासुन ते घरी परत आलेले नाहीत, त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. ते नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची ०५ फुट, ०८ इंच, रंग- सावळा, केस काळे, नाक-सरळ, डोळे-काळे, चेहरा-गोल, अंगाने-मध्यम, अंगता-शर्ट व फुल पँट, भाषा-मराठी, सवयी-दारु पिणे व तंबाखु खाणे असे वर्णन आहे.
वाहिद हसनमियॉ गैबी, वय वर्षे ४५ (सध्याचे वय), रा.वेसवी, ता.मंडणगड येथून दि. २ मे २००५ रोजी सकाळी १० च्या सुमारास त्यांच्या रहात्या घरातून मुंबई येथे नोकरीनिमित्त जात आहे, असे सांगून निघून गेले तेव्हापासून ते घरी परत आलेच नाही. नापत्ता झाले आहेत. त्यांची उंची ०५ फुट, रंग- निम गोरा, चेहरा-उभट, केस-काळे, नाक-सरळ, डोळे-काळे, नेसणीस-हिरव्या कलरचा पट्टे असलेला शर्ट व काळ्या रंगाची फुल पँट, भाषा-हिंदी, मराठी.
सौ. कल्पना नरेश बिश्वकर्मा वय-४० रा.गॅलेक्सी अपार्टमेन्ट ,अशोक लांजेकर नगर, उद्यमनगर मुळ रा.मोया कैलैलया, नेपाळ त्यांच्या रहत्या घरातून १९ जून २०१९ रोजी सकाळी ७ च्या सुमारास नापत्ता झाल्या आहेत. त्यांचा बांधा-मजबूत,डोळे-काळे,केस -लांब काळे, गळ्यात मंगळसूत्र, ४० धर्म हिन्दू जात- बिश्वकर्मा, उंची ५ फुट ५ इंच रंग – गोरा, नाकात सोन्याची पुली, नेसणीस साडी व ब्लाऊज सोबत ५००००/-मोबाईल नाही.
सुनंदा शंकर घवाळी वय ७५ रा. टिके कांबळेवाडी ता.जि.रत्नागिरी या त्यांच्या रहात्या घरातून येथून दि. ३० जून २०१९ रोजी दुपारी १.२९ वा.च्या दरम्यान नापत्ता झाल्या आहेत. त्यांची उंची ५ फुट ५ इंच चेहरा उभट, केस लांब सरळ, दात अर्धे पडलेले, रंग गोरा नेसणीस नऊवारी साडी.




