
चिपळुणात आतापर्यंत ४,०९९ वाहनांची झाली तपासणी
चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ५ ठिकाणी सुरू केलेल्या तपासणी नाक्यांवर आतापर्यंत ४,०९९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये काहीही संशयास्पद न सापडल्याने जप्तीची कारवाई करण्यात आलेली नाही.
न.प.च्या नगराध्यक्ष व २८ नगरसेवकपदांसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सध्या अर्ज मागे घेण्याची मुदत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोठेही चुकीचे प्रकार घडू नयेत म्हणून प्रशासनाने पाग ऑक्ट्रायनाका, बहादूरशेख मच्छीमार्केट, पेढे फरशीतिठा, कळंबस्तेफाटा, मिरजाळी बायपास रोड येथे गेल्या काही दिवसांपासून तपासणी नाके सुरू केले आहेत. हे नाके दिवस रात्र सुरू राहत असून येथे नियुक्त अधिकारी, कर्मचारी येणार्या वाहनांची तपासणी करीत आहेत.www.konkantoday.com




