
कोकण मार्गावरील मडगाव, रत्नागिरी आणि उडपी या ३० स्थानकांवर डिजिटल मनोरंजनांसाठी रेल्वेचा करार
कोकण मार्गावरील मडगाव, रत्नागिरी आणि उडपी या ३० स्थानकांवर कनेक्टिव्हीटी आणि डिजिटल मनोरंजन सेवांसाठी कोकण रेल्वेने ब्लू क्लाउड सॉफ्टटेक सोल्युशन्स लिमिटेडसमवेत सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली. याद्वारे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. रेल्वे नेटवर्कमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू झाल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबई येथे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या करारानुसार ब्लू क्लाउड टप्प्या-टप्याने रेल्वे स्थानकांवर डिजिटल उत्पादने आणि ५ जी फिक्स्ड वायरलेस ऍक्सेस सेवा प्रदर्शित करणार आहे. प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करून त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक बळकट केला जाणार आहे. यासाठी उच्च गुणवत्तेच्या मनीरजनांमध्ये सुधारणा घडवून आणल्या जाणार आहेत. यामुळे कोकण रेल्वे आणि ब्लू क्लाउड या दोघांनाही रेल्वे परिसरात डिजिटल सेवा देण्याच्या ऑपरेशनल व्यवहार्यता, प्रवाशांच्या सहभागाची पातळी आणि दीर्घकालीन आर्थिक फायद्यांचे मूल्यांकन करण्यास मदल होणार आहे.www.konkantoday.com




