
२४ तासात चोरट्या गजाआड… दापोली पोलिसांची कामगिरी
-दापोली शहरातील एसटी स्टँडच्या मागे असलेल्या जि.प.उर्दू प्राथमिक शाळेमध्ये दिनांक १९नोव्हेंबर२५ रोजी चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये दापोली पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून चोरट्याला गजाआड केले आहे.
काल दि. १९ नोव्हेंबर रोजी शाळा उघडल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील कपाट आणि इतर वस्तू विखुरलेल्या दिसून आल्या.चोरी झाल्याचे उघडकीस आले.त्यानंतर तातडीने दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झालेआणि तपासाची चक्रे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हिरेमठ मॅडम यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली.आणि अवघ्या२४ तासात दापोली पोलिसांनी या चोट्याला गजाआड करण्यात यश मिळवले. याबाबत दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून अधिकारी कारखेले आणि सहकारी शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती,पालक यांनी दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर,पोलीस उपनिरीक्षक पूजा हिरेमठ मॅडम,पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव आणि सर्व पोलीस स्थानकातील अधिकारी कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले.



