
वन्यप्राण्यांमुळे पीकहानीवर मिळणार विमा, केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालयाचा निर्णय
केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालयाने पंतप्रधान पीक विमा याेजनेच्या अंतर्गत शेतकèयांना मंगळवारी माेठा दिलासा दिला आहे. वन्यप्राण्यांकडून झालेले पिकांचे नुकसान आणि पुराच्या पाण्यात बुडालेल्या भातपिकाला अधिकृत स्वरुपात विमाकक्षेत सामील केले आहे. हा निर्णय दीर्घकाळापासून विविध राज्यांकडून केल्या जाणाèया मागणीनंतर घेण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय शेतकरी हिताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
वन्यप्राण्यांकडून पिकाच्या हाेणाèया हानीला स्थानिककृत जाेखीम श्रेणीच्या पाचव्या ’अॅड-ऑन कव्हर’च्या स्वरुपात मान्यता देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत राज्य सरकार प्रभावित जिल्हे आणि विमा संस्थांची ओळख ऐतिहासिक आकडेवारीच्या आधारावर करणार आहे. पिकहानीच्या स्थितीत शेतकरी 72 तासांच्या आत पीक विमा
अॅपवर जियाे-टॅग्ड ाेटाेसह माहिती नाेंदवू शकणार आहे. हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरिण आणि माकडांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा दीर्घकाळापासून सामना करत असलेल्या शेतकèयांसाठी ही नवी व्यवस्था दिलासा देणारी ठरणार आहे. वनक्षेत्र आणि
पर्वतीय भागांनजीक वसलेले शेतकरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे सर्वाधिक प्रभावित हाेत राहिले आहेत. आतापर्यंत अशाप्रकारचे नुकसान पीक विमा याेजनेत सामील नसल्याने शेतकèयांना माेठी आर्थिक हानी सहन करावी लागत हाेती.www.konkantoday.com




