
महायुती तोडायच जो निर्णय झाला आहे तो जिल्ह्यातून झालेला नाही- निलेश राणे यांचा आरोप
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना भाजपा महायुती तुटली आहे मात्र ही महायुती भाजपाच्या एका प्रदेश पातळीवरील मुख्य नेत्याच्या आदेशावरून ही महायुती तुटल्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. महायुती तोडून राणे यांचे प्रस्थ कमी कमी करून राणे यांच्या घरातच शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न एका नेत्याने केल्याची खुलेआम चर्चा रंगली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार असलेले युवा नेते आमदार निलेश राणे हे बेधडक व स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यातील महायुती ही भाजपच्या बाहेरच्या नेत्याकडून तुटली आहे जिल्ह्यातील नेत्यांकडून नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया देत निलेश राणे यांनी भाजपाच्या प्रदेश पातळीवरील एका बड्या नेत्यावर थेट निशाणा साधल्याची चर्चा आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार नारायण राणे यांनी महायुती व्हावी म्हणून स्पष्ट भूमिका घेतली होती. यासाठी नारायण राणे यांच्या समवेत शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत, दीपक केसरकर मंत्री नितेश राणे, निलेश राणे यांची एकत्रित बैठकही झाली महायुती व्हावी यासाठी प्राथमिक चर्चाही झाली मात्र भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून महायुती न करण्याचा सिग्नल देण्यात आला त्यामुळे जिल्ह्यात ही महायुती होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही नगरपरिषद व नगरपंचायत शिवसेना भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी त्यांच्या कणकवली दौऱ्यात माध्यमांचा बोलताना भूमिका स्पष्ट केले आहे इतकच नाहीतर नाव न घेता त्यांनी एका भाजपाच्या बड्या नेत्यावर निशाणा साधला आहे.
महायुती तोडायच जो निर्णय झाला आहे तो जिल्ह्यातून झालेला नाही नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हा महायुतीत तोडायचा जो निर्णय झाला आहे तो बाहेरून झालेला आहे. आणि मी यापूर्वी अनेक पत्रकार परिषदेमधून स्पष्ट केला आहे ना आता हे नातं असतं ते असं कुठल्या निवडणुकीत निवडणुकांमुळे तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही. महायुतीबाबत जे डिसिजन घेतले गेले ते भारतीय जनता पक्षाच्या वरच्या स्तरावरून घेतले गेले जे आम्हाला दिसत आहे. म्हणून आम्हाला जे करायचं होतं त्यासाठी आम्ही खूप वेळ थांबलो पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांचा डिसिजन होत नव्हता म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला.
आम्ही खूप दिवस थांबलो त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर येत नव्हतं किती बैठका करायचे त्यालाही काही मर्यादा असतात या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आमदार खासदारांच्या नाहीत म्हणून आम्ही राणे साहेबांना भेटून त्यांना सांगून हा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत त्या ठिकाणी शिवसेना पाठिंबा देणार हा आम्ही निर्णय घेतला आहे असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केलं.




