
बिबट्याला पकडण्यासाठी राजापुरात पिंजरे लावणार, वनविभागाची माहिती
राजापूर शहरातील समर्थनगर भटाळी परिसरामध्ये बिबट्याने दुचाकीस्वाराचा पाठलाग केला हाेता त्या भागामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे बिबट्याला पिंजèयामध्ये जेरबंद करण्याच्या हालचाली वनविभागाकडून सुरू असल्याची माहिती राजापूरचे वनपाल जयराम बावदाने यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील लाेकवस्तीमध्ये बिबट्याचा सातत्याने संचार सुरू असून दाेन वर्षापूर्वी बिबट्याने दुचाकीस्वाराचा पाठलाग केल्याचीही घटना घडली हाेती. एवढेच नव्हे तर, बिबट्याने चक्क पाेलीस स्टेशनमध्ये घुसून कुत्र्याची शिकारही केली हाेती. सद्यस्थितीत बिबट्याचा वावर हा लाेकवस्तीमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरात दाेन वर्षापूर्वी बिबट्याने पाेलीसलाईन परिसरातील काेदवलीकडे जाणाèया रस्त्यावर एका महिला दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटना घडली हाेती. त्यानंतर, पुन्हा एकदा गेल्या कांही दिवसांपासून शहरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.www.konkantoday.com




