
दापाेली तालुक्यातील खाेताची वाडी रिसाॅर्टसमाेर दुचाकीच्या धडकेत बाप-लेक जखमी
दापाेली तालुक्यातील खाेताची वाडी रिसाॅर्टसमाेरील रस्त्यावर 15 नाेव्हेंबर राेजी सकाळी 8.45 च्या सुमारास झालेल्या अपघातात हर्णे येथील पत्रकार राजेश राजाराम लिंगायत आणि त्यांची मुलगी वृंदा लिंगायत जखमी झाले. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविराेधात दापाेली पाेलिसात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.
पत्रकार राजेश लिंगायत (44, रा. मल्लखांबपेठ, गुरववाडी, हर्णे) हे आपली मुलगी वृंदा हिला शाळेत साेडण्यासाठी एमएच 08 ईयू 9023 या दुचाकीवरून दापाेलीकडे जात हाेते. यावेळी सालदुरे खाेताची वाडी रिसाॅर्ट परिसरात अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जाेरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताची नाेंद दापाेली पाेलिसात करण्यात आली.www.konkantoday.com




