
चिपळूण तालुक्यातील कळवंडे परिसरातून गुरांची अवैध वाहतूक तुरळमध्ये गुरांची अवैध वाहतूक रोखली, आरोपी ताब्यात
चिपळूण तालुक्यातील कळवंडे परिसरातून गुरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी पहाटे पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने तुरळ येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी आयशर गाडी रोखत कारवाई केली. या कारवाईत गाडीसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
कळवंडे परिसरात गुरांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळताच
तुरळ पकडलेल्या गुरांच्या गाडीसह पोलीस व गोरक्षक सतर्क झाले होते. मंगळवारी गोरक्षक मिलिंद चव्हाण यांना चिपळूण-कळवंडे येथून गुरांची अवैध वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली. त्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष व श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष समितीचे जितेंद्र चव्हाण यांच्यासह मिलिंद चव्हाण, मंदार पिळणकर, सुजाण पिळणकर, अजय जाधव, ऋषीकेश खानविलकर, शिंदे सेनेचे उपतालुकाप्रमुख स्वरुप साळवी, राहुल हाडमनी आदी गोरक्षकांनी पाळत ठेवून बुधवारी पहाटे ३.३० वाजता पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
चिपळूण-कळवंडे येथून मलकापूरकडे ६ गुरे घेऊन जाणारी आयशर गाडी (क्र. एमएच ०९ सीवाय ३५६३) तुरळ येथे ताब्यात घेण्यात आली. या घटनेची माहिती जितेंद्र चव्हाण यांनी तात्काळ संगमेश्वर पोलिसांना दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक साळवी व हेडकॉन्स्टेबल वैभव चौघुले यांनी घटनास्थळी येऊन गाडीसह चालक सलमान पठाण (मलकापूर) याला ताब्यात घेतले. या भागातून पुन्हा अवेव वाहतुक झाल्यास कडक पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा गोरक्षकांनी दिला आहे. पकडलेली गुरांची गाडी माखजन पोलीस ठाण्यात नेल्यानंतर गुरांना खाली उतरवून त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
www.konkantoday.com




