
गुहागर एसटी आगारात प्रवाशांसाठी आता सेल्फी पॉईंटची सोय
आबलोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुहागर आगार येथे प्रवाशांना आणि पर्यटकांना एसटी बसकडे आकर्षित करण्यासाठी खास सेल्फी पॉईंटची सोय करण्यात आली असून सेल्फी काढण्यासाठी प्रवाशी आणि पर्यटकांची गर्दी होत आहे.
हा आकर्षक सेल्फी पॉईंट बनवण्यासाठी गुहागर आगारमधील कर्मचारी एस. आर. जाधव, ए. डी. काटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी गुहागर एसटी आगाराचे व्यवस्थापक अशोक चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी, कार्यशाळेतील अधिकारी यांनी मार्गदर्शन केल्याचे गुहागर तालुका प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी सांगितले.




