
उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रचंड वेगाने वाहणाèया मतलई वाèयांमुळे मासेमारी संकटात
उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रचंड वेगाने साेसाट्याचे वारे वाहू लागल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीला वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मच्छीमारांना मासेमारी करणे कठीण झाल्याने मच्छीमारी नाैकांनी मिळेल, त्या बंदराचा तसेच खाड्यांचा आधार घेतला आहे. पुन्हा एकदा वातावरणामुळे मासळी उद्याेगावर ऐन हंगामात संक्रात आल्यामुळे मच्छीमार चिंतेत पडला आहे. किमान 100 नाैकांनी रत्नागिरी बंदरात, साधारण 400 नाैकांनी हर्णे बंदरात तर जयगड खाडीत 100 ते 150 नाैका तर किमान 100 नाैकांनी आंजर्ले खाडीत व साधारण 50 नाैकांनी दिघी खाडीचा आसरा घेतला आहे. अजूनही पुढील 2 दिवस असेच शांत रहावे लागणार आहे.. आता आणखी 4 दिवस मासळी मिळणार नाही. त्यामळे अनेक बाजारातील मासळी विक्री करणाèया महिलांनाही फटका बसला आहे.www.konkantoday.com




