
१५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले नवे गटविकास अधिकारी निवासस्थान ओस
खेड शहरातील समर्थनगर येथे जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून १५ लाख रुपयांचा निधी खर्च करून नव्या गटविकास अधिकारी निवासस्थानाची उभारणी करण्यात आली. मात्र अद्याप नव्या निवासस्थानाचा वापरच सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे नवे निवासस्थान वापराविना ओस पडले आहे. निवासस्थान सभोवतालचा परिसर गवतासह झाडी झुडपांच्या विळख्यात अडकला आहे. मात्र प्रशासनाकडून परिसराची स्वच्छता करण्याचीही तसदी घेण्यात आलेली नाही.www.konkantoday.com




