
स्वरा साखळकरची महाराष्ट्र तायक्वांदो संघात निवड
रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ पंजाब यांच्या सहकार्याने २१ ते २३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा जलंदर (पंजाब) येथे आयोजित केली आहे. आज (१९ नोव्हेंबर) महाराष्ट्र संघ जलंदर येथे रवाना झाला आहे. स्वरा विकास साखळकर ही ३७ किलो खालील वजनी गटामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
स्वरा ही एसआरके तायक्वांदो क्लब मारुती मंदिर रत्नागिरी येथे राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच शाहरुख शेख यांच्याकडे प्रशिक्षण व मार्गदर्शन घेत आहे. या यशाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचबरोबर एसआरके क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन दिले आहे.




