
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आराध्य तहसीलदार दोन सुवर्ण , एक कास्य पदक संपादन केले
रत्नागिरी :- तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मान्यताप्राप्त तसेच अहिल्यानगर तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 वी क्यूरोगी व 5 वी पुमसे राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान साई सिल्वर लोन, शिर्डी (अहिल्यानगर) येथे उत्साहात पार पडल्या.
आराध्य राहुल तहसीलदार याने अप्रतिम कौशल्य दाखवत फ्रीस्टाइल पुमसे सुवर्णपदक , पेर फ्रीस्टाइल फुमसे सुवर्णपदक पुमसे टीम कास्यपदक पटकावीत दमदार खेळ करून आराध्य याला रत्नागिरी तालुक्याचे तायक्वांदो तज्ञ प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे आराध्य हा
गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूल रत्नागिरी येते सहावी इयत्तेत विकत असून प्रशालेचे मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर तसेच क्रीडाशिक्षक कदम सर पुनम मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या आराध्याच्या उज्ज्वल यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा, सुभाष पाटील, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर, तसेच जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, यांनी शुभेच्छा दिल्या.
युवा अकॅडमीचे पदाधिकारी पालक प्रशालेचे शिक्षक यांनी आराध्य याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.




