
रत्नागिरी शहरातील प्रकाश वस्तू भांडारचे मालक श्रीकांत मुकादम यांचे निधन
रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर नजिकच्या प्रसिद्ध प्रकाश वस्तू भांडारचे मालक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका संघचालक श्रीकांत अनंत मुकादम (वय ८९) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
रानपाट गावचे प्रमुख मानकरी असलेले श्रीकांत मुकादम सामान्य स्वयंसेवक ते तालुका संघचालक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. सन १९७५ च्या आणीबाणीत त्यांनी तुरूंगवासही भोगला. नुकताच त्यांचा शासनाच्या वतीने सन्मानही करण्यात आला होता. सन १९९२ मध्ये अयोध्या येथील श्रीराम मंदिर करसेवेतही त्यांनी भाग घेतला. संघचालक प.पू. गोळवलकर गुरूजी यांच्या मूळगावी गोळवली येथे स्मारक उभारणीचे मोठे काम राष्ट्रीय सेवा समिती या संस्थेकडे आले. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत मुकादम यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.www.konkantoday.com




