
रत्नागिरी जिल्हयातील २८ कृषी मंडळांमध्ये नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मेळावे व प्रदर्शनांचे आयोजन
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने कुलगरु डॉ. संजय भावे यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील एकूण २८ कृषी मंडळामध्ये शेतकरी मेळावे व कृषी प्रदर्शनाचे नियोजन नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये करण्यात आले आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर उपक्रमाचा शुभारंभ नुकताच विद्यापीठाच्या सर विश्वेशरैया सभागृहात पार पडला. यानंतर खेड तालुक्यातील मेळाव्यात संवणसमधील विद्यापीठामधील शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. यानिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी बँक व कृषीच्या योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. सखाराम देसाई, डॉ. मंदार खानविलकर, डॉ. प्रफुल्ल आहिरे, डॉ. सुदेशकुमार चव्हाण, समीर झगडे, सवणसेचे मंडळ कृषी प्रवीण घाणेकर, सिद्धेश पाटील, अनिकेत मेंगे, राजेश दिवेकर आदींनी प्रयत्न केले.
www.konkantoday.com




