
महायुतीच्या प्रचाराचा नारळ प्रभाग ५ मधून फुटला

रत्नागिरी : नगरपालिकेमध्ये महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर आता प्रचाराची रंगत वाढताना दिसून येत आहे. महायुतीच्या प्रचाराचा नारळ प्रभाग क्रमांक ५ मधून फोडण्यात आला.

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये महायुती म्हणजेच शिवसेना-भाजपतर्फे नगराध्यक्ष पदाची माळ शिल्पा सुर्वे यांच्या गळ्यात पडली आहे. त्यानंतर आता उमेदवारसांह कार्यकर्तेही जोमाने कामाला लागल्याने आता प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे.

प्रभाग ५ मध्ये सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार यांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली आहे. रत्नागिरीच्या विकासासाठी तसेच विभागाच्या बाबतीत असणाऱ्या अनेक अडचणी, पर्यटन, स्मार्ट सिटी, कचरा प्रश्न, पाणी प्रश्न, मोकाट जनावरे आदींच्या प्रश्नांबाबत नागरिकांना योग्य न्याय देण्याचे प्रयत्न व ठोस उपाययोजना करण्यासाठी महायुती सक्षम असल्याचे या उमेदवारांनी सांगितले.
एकंदरीतच रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी “काँटे की टक्कर” होताना दिसून येणार आहे.




