
चिपळूण नगर परिषद निवडणुकीत पालकमंत्र्यानी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार!
चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष सुरूवातीपासूनच महायुतीसाठी आग्रही होता आणि आजही आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांची आणि माझी सातत्याने चर्चा सुरू होती. नगराध्यक्षपदासाठी महायुतीमध्ये एकदिलाने निर्णय व्हावा, अशी आमची इच्छा होती. महायुतीचे उमेदवार सुध्दा एकत्र जाहीर व्हायला हवे होते ते झाले नाही. शेवटच्या क्षणापर्यंत याबाबत कोणतीही चर्चा न झाल्याने अखेर
नगराध्यक्षपदासह पंधरा जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे केले आहेत. पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर ठिक अन्यथा राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याचीही तयारी आहे, अशी स्पष्ट भूमिका आमदार शेखर निकम यांनी मांडली.
www.konkantoday.com




