
खेड नगरपरिषद निवडणुकीत ट्विस्ट
उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेत वैभवी खेडेकर यांनी भाजपकडून भरलेला अर्ज ठरला अवैध
मात्र स्वतंत्रपणे दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज ठरला वैध
नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या ८ उमेदवारी अर्जांपैकी ५ अर्ज ठरले वैध
३ अर्ज ठरले अवैध
छाननीदरम्यान कागदपत्रांमधील त्रुटी, अपूर्ण माहिती, तसेच नियमानुसार आवश्यक पुरावे नसल्यामुळे ३ अर्ज करण्यात आले बाद
वैभवी खेडेकर या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात राहणार
या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता
दरम्यान नगरसेवक पदासाठी दाखल ८२ अर्जांपैकी १७ अर्ज ठरले अवैध.. तर ६५ उमेदवारांचे अर्ज ठरले वैध




