
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रत्नागिरीत अभिवादन
रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना नेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, विधानसभा महिला क्षेत्र संघटक सौ. सायली पवार, युवासेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, शिवसहकार सेना उपजिल्हा संघटक प्रवीण साळवी, उपतालुका प्रमुख विजय देसाई, सुभाष रहाटे, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुका संघटक सौ. रेश्मा कोळंबेकर, गंधाली मयेकर, मिताली पवार, विभाग प्रमुख मयुरेश पाटील, किरण तोडणकर, शशिकांत बारगोडे, नयन साळवी, शिवप्रसाद जौजाळ, राजेंद्र नेरकर, अमित खडसोडे, साजिद पावसकर, प्रशांत सुर्वे, राजाराम रहाटे, उपविभाग प्रमुख सचिन सावंतदेसाई, अनिल नाखरेकर, राजेंद्र सुर्वे, पंकज पुसाळकर व तालुक्यातील, शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.




