
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
इयत्ता ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.ही परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ला आयोजित करण्यात आली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ डिसेंबर २०२५ आहे.
तसेच इयत्ता ४थी व ७वी या विद्यार्थ्यांची परीक्षा मात्र एप्रिल-मे या दरम्यान घेण्यात येणार आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून, २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान नियमित शुल्कासह चालू राहील. आणि १ ते ३१ डिसेंबर दरम्यान विलंब शुल्क भरूनही विध्यार्थी अर्ज करू शकतात.
या परीक्षेत ४ विषयांचा समावेश आहे
प्रथम भाषा
गणित
तृतीय भाषा
बुद्धिमत्ता चाचणी
ही परीक्षा एकूण ३०० गुणांवर होणार आहे.
शिष्यवृत्ती किती मिळणार?
यात उत्तीर्ण ठरणाऱ्या चौथीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ५,००० रुपये तर सातवीच्या विद्यार्थ्यांना ७,५०० रुपये इतकी शिष्यवृत्ती देण्यात येईल. तर शासनाच्या नव्या नियमांनुसार पाचवी आणि आठवीसाठीची ही शिष्यवृत्ती परीक्षा यावेळी शेवटची असेल.
४थी व ७वीची शिष्यवृत्ती परीक्षा
४थी व ७वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २०२५- २६ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षेनंतर घेण्यात येईल. या परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा परिषद डिसेंबर महिन्यात जाहीर करण्याची शक्यता आहे.
शासनाच्या नियमानुसार, २०२६ नंतर ४थी व ७वीसाठीच शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. यंदा ४थी ते ८ वीचे विद्यार्थी मिळून जवळपास १५ हजाराहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार असून त्यांचे शुल्क जिल्हा परिषद सेस फंडातून भरण्यात येणार आहे.




