
निवृत्त वेतनधारक युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी २० व २१ नोव्हेंबर रोजी सातारा येथे शिबिर
रत्नागिरी, दि.17 : जिल्ह्यातील निवृत्त वेतनधारक युद्ध विधवा, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच अवलंबितांना रक्षा लेखा महानियंत्रक यांच्यामार्फत पीसीडीए (पेंशन) यांची टीम स्पर्शबाबत माहिती देण्यासाठी तथा विविध अडचणी सोडविण्यासाठी दि. २० व २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सैनिक स्कूल, सातारा येथे दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहणार आहे.
या कालावधीमध्ये त्यांचेमार्फत डिजिटल हयातीचे दाखले. मॅन्युअल हयातीचे दाखले, विविध सेवा जसे नॉमिनीच्या नावात बदल, मोबाईल नंबर बदलणे, ई-मेल आयडी बदलणे / अद्यावत करणे, कुटुंबातील अवलंबीतांचे जन्म दिनांक बदलणे, सैनिकांचे मृत्यु बाबत माहीती देणे व कुटुंब निवृत्ती वेतन सुरु करणे इ. तसेच इतर तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थीनी घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
000




