
राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत मंथन आंबेकर सुवर्ण पदक
रत्नागिरी :- तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मान्यताप्राप्त तसेच अहिल्यानगर तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 वी क्यूरोगी व 5 वी पुमसे राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान साई सिल्वर लोन, शिर्डी (अहिल्यानगर) येथे उत्साहात पार पडल्या.
मंथन पांडुरंग आंबेकर याने अप्रतिम कौशल्य दाखवत फ्रीस्टाइल पुमसे सुवर्णपदक , पूमसे टीम कांस्य पदक पटकाविले मंथन याला रत्नागिरी तालुक्याचे तायक्वांदो तज्ञ प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे मंथन हा श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी प्रशालेचा विद्यार्थी आहे शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पाटणकर क्रीडा शिक्षक – श्री. प्रमोद कदम, श्रीमती पूनम भरणकर यांनी शुभेच्छा दिल्या मंथन याच्या उज्ज्वल यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा, सुभाष पाटील, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर, तसेच जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, यांनी शुभेच्छा दिल्या.
युवा अकॅडमीचे पदाधिकारी पालक प्रशालेचे शिक्षक यांनी मंथन याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या




