
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत नाराज इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे महायुतीने आपले निम्मे उमेदवार जाहीर केले असले तरी उर्वरित भागात महायुतीतील मोठ्या प्रमाणावर इच्छुक असलेल्या उमेदवारांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार काही भागात प्रस्थापितांना देखील डावलण्यात आल्याचे वृत्त आहे त्यामुळे हे नाराज इच्छुक पक्षांतर करून महाविकास आघाडी मधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे रत्नागिरी शहरातील कोकण नगर भागात प्रस्थापितांना उमेदवारी नाकारल्याचे वृत्त आहे त्यामुळे संबंधितांनी आपल्या स्टेटस वर आघाडीतील उबाठा व तुतारीचे चिन्ह ठेवले आहे त्यामुळे आता शेवटच्या दिवशी बंडखोरी होणार हे निश्चित आहे महायुतीतील भाजपमध्ये देखील काही प्रमाणात नाराजी असून काही जणांनी भाजप सोडून अन्य पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे आज शेवटच्या दिवशी देखील काही ठिकाणी पक्षांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महायुतीचे नेतृत्व पालकमंत्री मंत्री उदय सामंत करीत असून ते महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादीला विश्वासात घेऊन उमेदवाराच्या घोषणा करीत आहेत मात्र पालकमंत्र्यांच्या गाडीतून फिरलो किंवा पालकमंत्र्यांबरोबर फिरलो म्हणून उमेदवारी मिळेल या भ्रमात राहू नका असा इशारा त्यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना दिला होता त्याचे प्रत्यंतर काही जणांना येऊ लागल्याने हे नाराज इच्छुक उमेदवार कोणती भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे आज अर्ज भरण्याचा दिवस असल्याने संध्याकाळपर्यंत खरोखरच नाराज झालेले उमेदवार बंडखोरी करणार की तडजोड करणार याचे चित्र स्पष्ट होईल



