
महायुतीचे नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार- पालकमंत्री उदय सामंत
नगराध्यक्ष पदासह अन्य महायुतीच्या उमेदवारांनी भरले आपले अर्ज
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती सर्व ताकदीनिशी उतरली असून कोणत्याही परिस्थितीत नगरपालिकेत महायुतीची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे आज जयस्तंभ येथील कॉर्नर सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले महायुतीचे नगराध्यक्षव नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी नगराध्यक्षाचे उमेदवार सौ शिल्पा सुर्वे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपण पारदर्शकपणे कारभार करू असा विश्वास त्यांनी दिला यावेळी शिवसेनेचे स्थानिक नेते उपस्थित होते त्यानंतर मिरवणुकीने उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार अर्ज भरण्यासाठी नगर परिषदेत दाखल झाले








