
देवरुख नगरपंचायत निवडणूक; दीपक खेडेकर यांचा महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल
आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १६ मधून श्री. दीपक गंगाराम खेडेकर यांनी महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) कडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
श्री. खेडेकर हे आमदार शेखर निकम यांचे जवळचे व विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. स्थानिक पातळीवर त्यांनी दीर्घकाळ सक्रिय राहून जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
२०१८ मधील नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, त्या वेळी अवघ्या २० मतांनी पराभव झाला होता. त्या पराभवातून शिकत त्यांनी यावेळी विजयासाठी भक्कम तयारी केली असून, स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण आहे.
सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते नेहमी आघाडीवर असतात. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांना सर्व स्तरांवर पाठिंबा मिळत आहे.
शांत, मितभाषी आणि जनसंपर्कात कुशल असा त्यांचा स्वभाव असल्याने प्रभाग क्रमांक १६ मधील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




