
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहूनठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्षपदाचा अर्ज होणार दाखल
लाखो शिवसैनिकांचे दैवत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या (१७ नोव्हेंबर) बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. तसेच या दिनाचे औचित्य साधत शिवसेना पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीनेरत्नागिरीत नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
उद्या सकाळी १० वाजता रत्नागिरी शहरातील शिवसेना शाखा साळवी स्टॉप, तसेच १०.३० वाजता शिवसेना नेते सचिव तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी ११ वाजता रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील व शहरातील ठाकरे शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, अंगीकृत सर्व संघटना शिवसैनिकांनी नियोजित वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आणि युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी केले आहे.




