
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग-कासार्डे राज्य मार्गावर ट्रकने धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग-कासार्डे राज्य मार्गावरील वेळगिवे हद्दीत असलेल्या धोकादायक नागरी वळणाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण अपघात झालाया अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव गावातील सुधाकर सिताराम गुरव (40) आणि अनंत बाबला गुरव (60) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात दूर फेकले गेले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
सुधाकर व अनंत गुरव हे दोघे विजयदुर्ग-कासार्डे मार्गावरून तळेरे येथे कामानिमित्त जात असताना समोरून येणाऱ्या चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.




