
संगमेश्वर साडवली येथील वनाज कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या चार जणांना अटक
संगमेश्वर -देवरुख राज्य मार्गावरील साडवली येथील वनाज कंपनीत अज्ञातांनी सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास करण्याचा प्रयत्न केला आरोपींनी वनाज इंजिनियर्स लिमि. साडवली या कंपनीच्या भिंतीवरुन खाली उतरुन कंपनीचे गॅस बँक येथील लोखंडी दरवाज्या मधुन आत प्रवेश करुन नुमद वर्णनाचे व किंमतीचे जंक्शन ब्लॉक त्यामध्ये फोजिंग, ड्रम, कट असे स्पेअर पार्ट दातार ट्रेडर्स साखरपा नाव असलेले १४ गोणत्याचे पोत्यामध्ये भरुन सुमारे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा एवज कंपनी मधुन चोरुन नेण्याचा प्रयत्न केला.
यातील चोरट्यांना देवरूख पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडील २ लाख ४५ हजार रु. किंमतीचे जंक्शन ब्लॉक त्यामध्ये फोजिंग, ड्रम, कट असे सुमारे १३०७ स्पेअर पार्ट भरलेली सुमारे ४६५ किलो वजनाची एकुण १४ गोणत्याची पोती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुरक्षारक्षक आणि आवाज देतात चोरट्याने तात्काळ पलायन केले. मात्र, चोरट्याने सोडलेला पुरावाच पोलीस तपासात महत्त्वाचा ठरला आणि गुन्हा दाखल होताच देवरुख पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. चार जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांना चार दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे.
याबाबतची फिर्यादी विलास दामोदर पुरोहित (वय ७२, रा. सायले शिंदेवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दिली. यावरुन शुभम संजय जोयशी (वय १८, रा.कोंडगाव जोयशीवाडी), दिपक सुभाष गुरव (वय ३३, बोंड्ये भेरेवाडी), आदित्य बळीराम भेरे (वय २४, बोंड्ये भेरेवाडी), प्रदीप चंद्रकांत गुरव (वय २६, बोंड्ये गुरववाडी ता. संगमेश्वर) यांच्यावर देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींनी वनाज इंजिनियर्स लिमि. साडवली या कंपनीच्या भिंतीवरुन खाली उतरुन कंपनीचे गॅस बँक येथील लोखंडी दरवाज्या मधुन आत प्रवेश करुन नुमद वर्णनाचे व किंमतीचे जंक्शन ब्लॉक त्यामध्ये फोजिंग, ड्रम, कट असे स्पेअर पार्ट दातार ट्रेडर्स साखरपा नाव असलेले १४ गोणत्याचे पोत्यामध्ये भरुन सुमारे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा एवज कंपनी मधुन चोरुन नेण्याचा प्रयत्न केला.
यातील चोरट्यांना देवरूख पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडील २ लाख ४५ हजार रु. किंमतीचे जंक्शन ब्लॉक त्यामध्ये फोजिंग, ड्रम, कट असे सुमारे १३०७ स्पेअर पार्ट भरलेली सुमारे ४६५ किलो वजनाची एकुण १४ गोणत्याची पोती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.




