वरिष्ठ पातळीवरून आदेश न आल्याने जगबुडी नदीपात्राच्या गाळ उपशाचे काम थंडावले


खेड शहरातील नदीपात्रासह नारिंगी नदीपात्रातील उपसण्यात आलेल्या गाळामुळे यंदा पुराची टांगती तलवार बर्‍याचअंशी दूर झाली. यामुळे व्यापार्‍यांसह नदीकाठच्या रहिवाशांना दिलासा मिळाला. आतापर्यंत जगबुडी नदीपात्रातून १२,५४९ ब्रास म्हणजेच ३५,५१४ घनमीटर गाळ उपसण्यात आला. सद्यस्थितीत जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अजून आदेशच आला नसल्याची माहिती समोर आली आहे. आदेश प्राप्त झाल्यानंतरच नदीपात्रातील गाळ उपसण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने गाळ उपसण्यासाठी २ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात गाळ उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले. दोन वर्षांपूर्वी मे अखेरीस पाऊस पडण्यास सुरूवात होईपर्यंत गाळ उपसण्यात आला. त्यानंतर गतवर्षी दोन पोकलेन मशिनच्या सहाय्याने गाळ उपसा करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला होता. सलग तीन महिने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, नातूनगर पाटबंधारे उपविभागीय अधिकारी सत्यजीत गोसावी, कनिष्ठ अभियंता हेमंत ढवण, बलवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जूनपर्यंत गाळ उपसा करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. जगबुडी नदीपात्रातून उपसण्यात आलेल्या ३५,५१४ घनमीटर गाळामुळे यंदा पुरापासून काहीअंशी दिलासा मिळाला.
जगबुडी नदीपात्रातील साचलेला गाळ उपसण्यासाठी प्राप्त निधीपैकी निधी अजून शिल्लक आहे. या निधीतून नदीपात्रातील उर्वरित गाळ उपसा करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाला वरिष्ठांच्या आदेशाची वाट पहावी लागणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button