
लांजा नगरपंचायतीसाठी महायुतीच्या ९ उमेदवारांची यादी जाहीर
लांजा नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीने पहिल्या टप्प्यातील ९ उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. उमेदवार जाहीर होताच आमदार किरण सामंत यांनी सर्वांना निवडणुकीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पक्षाची ताकद एकजुटीने दाखवण्याचे आवाहन केले.
महायुतीचे जाहीर झालेले उमेदवार असे : प्रभाग क्र. १ मधून सौ. निधी नीलेश गुरव (शिवसेना), प्र.क्र. २ मधून पंढरीनाथ बाळकृष्ण मायशेट्ये (शिवसेना), प्र.क्र.३ मधून सौ. श्रद्धा संजय तोडकरी (शिवसेना), प्र.क्र.४ मधून सौ. सानिका समीर जाधव (शिवसेना), प्र.क्र.६ मधून योगेश गोपीनाथ कावतकर (शिवसेना), प्र.क्र. १० मधून प्रणाली गुरुप्रसाद तेली (भाजप), प्र.क्र. १३ मधून सौ. साक्षी किशोर मानकर (शिवसेना), प्र.क्र. १४ मधून वैभव यशवंत जोईल (शिवसेना) आणि प्र.क्र. १७ मधून सौ. शिवन्या शैलेश काळे (शिवसेना).
उमेदवारी घोषणेच्या वेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये आमदार किरण सामंत , माजी उपमहापौर अविनाश लाड, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपा जिल्हा संयोजक दीपक पटवर्धन, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बंटी वनजू, भाजपा जिल्हा चिटणीस हेमंत शेट्ये, सचिन वहाळकर, रिपाईचे अनिरुद्ध कांबळे, शहरप्रमुख महेंद्र शेडे, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, अमित केतकर, भाजपा तालुकाप्रमुख शैलेश खामकर, विराज हरमले, वर्षा प्रभू देसाई, सचिन डोंगरकर यांचा समावेश होता.
महायुतीच्या या उमेदवारी जाहीरनाम्याने लांजा नगरपंचायत निवडणुकीची तयारी आता अधिक गतीमान झाली असून आगामी दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.




