
रत्नागिरी तालुक्यातील जयगड समुद्रात मच्छिमार बोटीवरील खलाशाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील जयगड समुद्रात मासेमारी करताना बोटीवरील खलाशाचा आकस्मिक मृत्यू झाला. रोहित जगबहाद्दूर चौधरी (४७, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. रोहित हा मिरकरवाडा येथील मच्छिमार बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. १२ नोव्हेंबर रोजी ते जयगड येथील समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा मिरकरवाडा जेटी येथे परतत असताना रोहित हा बोटीवर झोपला होता. यावेळी त्याच्या सहकार्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. रोहित याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले, अशी नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




