
रत्नागिरी तहसील कार्यालयाच्या बाहेर आधार अपडेटसाठी लागल्या लांबच लांब रांगा
रत्नागिरी येथील तहसील कार्यालयात आधारकार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी उसळल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कार्यालय परिसराबाहेरपर्यंत नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासकीय अनास्थेमुळे ताटकळत उभे राहण्याची वेळ येत आहे.
आधार अपडेटच्या कामांसाठी कार्यालयात अपुरी आणि मर्यादित व्यवस्था असल्याने नागरिकांना तिष्ठत रांगेत उभे रहावे लागत आहे. आधार अपडेटसाठी येणार्या नागरिकांची संख्या मोठी असतानाही त्या प्रमाणात पुरेसे काऊंटर (केंद्रे) सुरू करण्यात आलेले नाहीत, अशी व्यथा नागरिकांकडून मांडण्यात येत आहे. गर्दीचा ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांसह पालकांना सामना करावा लागत आहे. तहसीलदारांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.www.konkantoday.com



