
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचा १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात महामोर्चा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांनी १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरील शासनाच्या दुर्लक्षाविरोधात ही आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली आहे.ङ्गङ्गयामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांनी दिली.
विविध मागण्यांवर शिक्षण मंत्री व वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने हा मोर्चा आयोजित करण्यात येत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. २००४ पासून माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती बंद असल्याने शाळांमधील कामकाज होत नाही. निवृत्ती, मृत्यू किंवा बदल्यांमुळे कर्मचार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत असून, कमी कर्मचार्यांवर वाढत्या कामाचा ताण येत आहे. शासनाकडून अनेक प्रस्ताव सादर करूनही, १०/२०/३० वर्षांच्या कालबद्ध प्रगतीसह विविध लाभांवर निर्णय प्रलंबित आहे.
www.konkantoday.com




