
पालघरातील ८ खलाशी पाकिस्तान कारागृहात, मच्छिमारांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरकारला आवाहन
समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींवर गोळीबार करून पाकिस्तानकडून ती जप्त रण्यात आली आहे. यातील ८ खलाशांना पाकिस्तान कारागृहात ठेवण्यात आले आहे. यातील एका खलाशाची तब्येत बिघडल्याने त्याला सोडण्यात आले असून उर्वरित खलाशांच्या सुटकेसाठी गुजरात मत्स्य व्यवसाय खात्याचे डेप्युटी डायरेक्टर यांची नुकतीच महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी भेट घेतली.
पालघर सातपाटी येथील कांचर मेहेर यांनी रामकृष्ण तांडेल यांना फोनवरून दिलेल्या माहितीनुसार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांचे वडील नामदेव बाळकृष्ण मेहेर हे ओखा येथे मासेमारी बोटीवर गेले असता त्या बोटीवर गोळीबार होवून बोट पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यानुसार तांडेल यांनी ओखा, पोरबंदर येथील बोट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मोरी, जीवन जुंगी, मधू भाई यांना माहिती देण्यात आली. मात्र भारतीय व पाकिस्तान मच्छिमार नेत्यांना बोटीचा पत्ता लागला नाही. अखेर १० नोव्हेंबर रोजी गुजरात गांधीनगरला कोस्टगार्डची माहिती देण्यात आली. त्यानुसार गुजरातचे मत्स्य व्यवसाय खात्याच उपसंचालक अधिकारी रमेशकुमार शेखरालिया यांची गुजरातचे मच्छिमार अशोक श्रीमाली व चंद्रकांत पटेल यांच्यासमवेत भेट झाली. बोट व खलाशांची चौकशी केली असता पाकिस्तानने ही बोट खलाशांसह जप्त केली असून बोटीतील ७ खलाशांना कारागृहात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सध्या ७ खलाशी अटकेत असून त्यांना लवकर सोडण्याची विनंती अधिकार्यांना करण्यात आल्याचे तांडेल यांनी सांगितले.www.konkantoday.com




