
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातपडताळणीसाठी उमेदवारांची कार्यालयात भाऊगर्दी
निवडणुकांसाठी विशिष्ट आरक्षणातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी समाजकल्याणच्या संबंधित कार्यालयात जातपडताळणीसाठी तब्बल १०७ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र जातपडताळणीकरिता येणार्या असंख्य अडचणी समोर असल्याने जातपडताळणी असलेले उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांची वणवण अद्याप संपलेली नाही.
जिल्ह्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. सर्वाधिक नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी सर्वात जास्त आरक्षण आहे. तर सोबतच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी काही ठिकाणी आरक्षण घोषित झाले आहे.www.konkantoday.com




