
नगर परिषदेतील इच्छूक उमेदवारांमुळे नगर परिषदेचे थकीत कर वसुल होवू लागले.
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका होत असून त्यासाठी अनेक इच्छूक उमेदवार सरसावले आहेत. मात्र यामुळे नगर परिषदेचा एकप्रकारे आर्थिक फायदा होत आहे. रत्नागिरी पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मी पालिकेचा थकबाकीदार नाही, असा नाहरकत दाखला शौचालय असल्याचा आणि मी ठेकेदार नसल्याचा दाखला असे आतापर्यंत १८० दाखले इच्छुक उमेदवार घेऊन गेले आहेत. काही सूचक आणि अनुमोदक तर उमेदवारांकडूनच थकीत करभरणा करून घेत आहेत.
जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगरपालिका आणि गुहागर, देवरूख व लांजा नगरपंचायतीमध्ये येत्या २ डिसेंबरला पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारांचा तसेच सूचक आणि अनुमोदकांचा कोणताही कर थकीत नसावा, ही अट आहे. त्यामुळे पालिका कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी आणि मी शौचालय वापरतो, मी पालिकेचा थकबाकीदार नाही, मी ठेकेदार नाही, असे दाखले घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष आदी इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज बाद होऊ नये यासाठी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालिकेचे हेलपाटे घालत आहेत.
www.konkantoday.com




