
देवरुख शहरातील मार्लेश्वर फाटा येथे गुरांची अवैध वाहतूक, दोघांवर गुन्हा
देवरुख शहरातील मार्लेश्वर फाटा येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी गाडी एसएसटी पथकाने पकडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. आयशर टेम्पोसह १० लाख ४८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी मलकापूर व देवरुख येथील दोघांवर देवरुख पोलिसात गुन्हा खल केला आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल माधुरी पिंगळे यांनी दिला. या प्रकरणी सैफान रमजान मुल्लानी (रा. मलकापूर, ता. हवाडी) उदय दत्तात्रय मांगले (रा. साडवली तेली वाडी, ता. संगमेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिषद नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पथके तैनात करण्यात आली आहेत. मार्लेश्वर फाटा येथेही पथक तैनात आहे. या पथकाच्या माध्यमातून मार्गावरून ये-जा करणार्या वाहनांची तपासणी सुरू होती.www.konkantoday.com




