
दापोली बनले मिनी महाबळेश्वर दापोलीचा पारा दहा अंशावर
मिनी महाबळेश्वर दापोली मध्ये पारा दहा अंशावर घसरला आहे.पाच नोव्हेंबर पर्यंत लांबलेल्या पावसाळ्यानंतर सहा नोव्हेंबर पासून वातावरणात बदल जाणू लागला.वातावरणातील तापमानाचा पारा १६,१५,१३,१२ असा हळूहळू खाली येत तापमान आता दहा अंशावर स्थिरावले आहे.
हवामान अभ्यासकांच्या मते हा परा आणखी खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दापोली हे पर्यटकांचे आकर्षणाचे पर्यटन स्थळ झाले असून या गुलाबी आणि छान थंडीमुळे दापोलीच्या पर्यटनाला अधिक उत्साह आला आहे.पुणे,सोलापूर ,नगर अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले पर्यटक समुद्रकिनारा आणि दापोलीच्या आल्हाददायी वातावरणामुळे सुखावून गेले आहेत.समुद्र स्नानानंतर संध्याकाळी गुलाबी थंडीमध्ये आम्रपाली होम स्टे च्या शाकाहारी पोपटी पार्ट्यांची मजा पर्यटक लुटत आहेत.वातावरणात झालेल्या चांगल्या बदलामुळे आंबा ,काजू बागातदार वर्गाच्या आशा ही आता पल्लवीत झाल्या आहेत




