
ग्रामपंचायतीने सूचना देवूनही मोकाट गुरे सोडणार्या मालकांवर गुन्हा दाखल
लांजा तालुक्यातील बेनीखुर्द खेरवसे ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष करून मोकाट गुरे सोडणार्या धदरे येथील तीन गुरे मालकांवर लांजा पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
जून २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गांजा ते धुंदरे या रस्त्यावर येथील गुरे मालक रवींद्र बालशेठ गांधी (५८), बाबल्या पांडुरंग लांबोरे (५७) व प्रभाकर, कृष्णा लिंगायत (५२, सर्व रा. धुंदरे लांजा) हे आपली गुरे मोकाट सोडत होते. ही गुरे लांजा-धुंदरे या रस्त्यावर मोकाटपणे फिरत असतात. तसेच रस्त्यात बसत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणार्या दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत होता. त्याचप्रमाणे काही छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही घडत होत्या. या प्रकरणी बेनीखुर्द खेरवसे ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली लोटणकर यांनी संबंधित गुरे मालकांना आपली गुरे मोकळी न सोडता ती बांधून ठेवावीत, अशा सूचना केल्या होत्या. मात्र त्यांच्या या सूचनेकडे या तीनही गुरे मालकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अखेर सरपंच लोटणकर यांनी लांजा पोलीस छाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, लांजा पोलिसांनी वरील तीनही गुरे मालकांवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे करत आहेत.
www.konkantoday.com




