
आचारसंहितेमुळे लांजा कोत्रेवाडीतील डंपिंग ग्राऊंडविरोधात असलेल्या उपोषणाला तात्पुरता विराम
कोत्रेवाडी डंपिंग ग्राऊंड विरोधात सुरु असलेल्या उपोषणाला आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता विराम देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला बाधा येवू नये तसेच आचारसंहितेचा भंग होवू नये याकरिता ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
१४ ऑगस्टपासून सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाने १३ नोव्हेंबर रोजी तब्बल ९३ दिवसांचा टप्पा गाठला. या काळात ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत प्रशासनाकडून डंपिंग ग्राउंडविरोधात आक्रोश सातत्याने नोंदवला होता.
आचारसंहिता लागू होताच लांजा पोलीस ठाण्याकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता उपोषण स्थगित केले. यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि मुख्याधिकारी अभिजित कुंभार उपस्थित होते. उपोषण मागे घेताना ग्रामस्थांनी लेखी पत्र सादर केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपताच उपोषण पुन्हा सुरू करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.www.konkantoday.com



