
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना नेपाळला पाठवा, तिथंही भाजपचे सरकार स्थापन होईल,’-स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरा याची बोचरी टीका
बिहारमध्ये भाजप-संयुक्त जनता दलप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बिहारमधये अभुतपूर्व विजय मिळवला. यावर प्रसिद्ध ‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरा याने बोचरी टीका केली आहे.कुणाल कामराने निवडणूक आयोग देखील लक्ष्य केले आहे. ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना नेपाळला पाठवा, तिथंही भाजपचे सरकार स्थापन होईल,’ असा टोला त्याने त्याच्या ‘एक्स’वरील पोस्टद्वारे लगावला आहे.
‘स्टँड अप कॉमेडियन’ कुणाल कामरा याने त्याच्या तिरकस शैलीतील ‘पोस्ट’ला काही वेळातच लाखो ‘व्ह्यूज’ मिळाले आहेत. तसंच हजारो प्रतिक्रियाही नोंदवल्या गेल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला अत्यंत घवघवीत यश मिळाल्यानंतर विरोधकांकडून भाजप (BJP)आणि निवडणूक आयोगावर टीका करत आहेत.




