
मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथे क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथील एच. पी. पेटोल पंपासमोर क्रेनने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दत्ताराम बाबू मोहिते (३०, डफळेवाडी-लांजा) हा दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातप्रकरणी क्रेन चालक अवधेशकुमार राजेंद्र चौहान (रा. गुलबर्गा, सध्या रा. लोटे) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वजेंद्र चौहान याने क्रेन (जी. जे.१६/एच.२९६६) खेडच्या दिशेने तोंड करुन अर्ध्या रस्त्यात धोकादायक स्थितीत उभी केली होती. पाठीमागून आलेल्या दुचाकीची (एम.एच.०४/जे.वाय.८६९७) या क्रेनला धडक बसली. यात दत्ताराम मोहिते यांना गंभीर दुखापत होवून दुचाकीचे नुकसान झाले. याबाबत पो. हे.कॉ. अजित कदम यांनी पोलीस ठाण्यात तकार नोंदवली.www.konkantoday.com




