
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथील सर्कलच्या तुटलेल्या कठड्याची दुरूस्ती

रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथील सर्कलच्या कठड्याला दोन दिवसांपूर्वी फिनोलेक्सकडून येणार्या अज्ञात ट्रकने धडक दिल्याने हा कठडा कोसळला होता. याबाबत कोकण टुडेने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता या कठड्याची दुरूस्ती हाती घेण्यात आली असून पूर्वी ज्या पद्धतीने कठडा बनवण्यात आला होता त्याच पद्धतीने कठड्याची दुरूस्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने जयस्तंभ सर्कलचे नुतनीकरण करण्यात आले होते. या नुतनीकरणाचे काम जे जे आर्टच्या माध्यमातून करण्यात येवून या सर्कलला किल्ल्याच्या बुरूजाचा आकार देण्यात आला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी ट्रकने धडक दिल्याने हा कठडा काही ठिकाणी तुटला होता. मात्र आता हा कठडा तातडीने दुरूस्ती करण्यात आल्याने नागरिकांच्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com




