
मंडणगड येथील आगारात एसटी कर्मचार्यांचे बंड सुरुच
मंडणगड येथील आगारातील चालक वाहक कर्मचार्यांनी आगार व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात १० – नोव्हेंबर रोजी पुकारलेले बंड दुसर्या दिवशीही कायम आहे. आगारातील चालक-वाहकांनी दुपारनंतर ओव्हर -. टाईम करण्यास नकार दिल्याने ग्रामीण भागातील १८ प्रवासी फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर (११) रोजी लांब पल्ल्याच्या १४ फेर्या रद्द करण्यात आला.
मात्र ग्रामीण फेर्या चालू ठेवण्यात आल्या. दरम्यान विभागीय वाहतूक अधिकार्यांनी मंडणड आगाराला भेट दिल्यानंतर कर्मचारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघालेल्या दुसर्या दिवशीही बसस्थानकाचे वेळापत्रक कोलमडले.www.konkantoday.com




